बुधवार, १५ जून, २०१६











वाहत असते पोरी
नदीचे पाणी अवखळ
नको जळात सोडूस पाय
अडकेल त्यात मीन मकरंद ;
हळदीच्या अंगाला सुटे 
ओला सुवास
सांजवात जळता सजणाचा ध्यास.
असे अंगसंग प्रितीचा रंग
साजणविरहात जळे
चंदनाचे अंग;
सोड जळाचा ध्यास 
नको अडकूस त्यात
तुझ्या वाटेवर असे
मेंदिचा सुवास.

smb



रुसवे असतील जरी ,मन दूखावण्याच्या 
नहाण्याने येऊन जा ना,
येतात तुला न येण्याचे लाख बहाने
न जाण्याच्या बहाण्याने 
एकदा तरी येऊन जा ना;
आसवे लपवीत जगतोय मी
जगासमोर रडण्याचा
खुला बहाणा देऊन जा ना
तुझ्या असण्याने असतो 
श्रावण रिमझिमता
पानझडीला पण फुलण्याचा 
उःशाप देऊन जा ना
श्वासाच्या अधीर ध्यासाला
असते आस जगण्याची
तु मृत्युचे चुंबन देऊन जा ना

                                                        -शाम मीना भानुदास