बुधवार, १५ जून, २०१६रुसवे असतील जरी ,मन दूखावण्याच्या 
नहाण्याने येऊन जा ना,
येतात तुला न येण्याचे लाख बहाने
न जाण्याच्या बहाण्याने 
एकदा तरी येऊन जा ना;
आसवे लपवीत जगतोय मी
जगासमोर रडण्याचा
खुला बहाणा देऊन जा ना
तुझ्या असण्याने असतो 
श्रावण रिमझिमता
पानझडीला पण फुलण्याचा 
उःशाप देऊन जा ना
श्वासाच्या अधीर ध्यासाला
असते आस जगण्याची
तु मृत्युचे चुंबन देऊन जा ना

                                                        -शाम मीना भानुदास

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा